ऑनलाइन मागवलेली बिर्यानी खाल्यानंतर 20 वर्षीय तरूणीचा मृत्यू

तिरुवनंतपुरम – कासारगोड येथील एका स्थानिक हॉटेलमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार तरूणीने ऑनलाइन जेवण ऑर्डर केले होते. ते खाल्यानंतर तीला त्रास होण्यास सुरुवात झाली होती.
पोलिसांनी सांगितले की, कासारगोडजवळील पेरुंबला येथील अंजू श्रीपार्वती (20) यांनी 31 डिसेंबर रोजी रोमानिया नावाच्या रेस्टॉरंटमधून बिर्यानी ऑनलाइन खरेदी केली होती आणि तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. अंजूच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळी मुलीचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत अहवाल दाखल करण्याच्या सूचना अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आल्याचे जॉर्ज यांनी पत्रकारांना सांगितले. डीएम या घटनेची आणि मुलीवर केलेल्या उपचाराची चौकशी करत आहेत.
अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार (एमएसएसए) अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्यात येईल, असे ते म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला, कोट्टयम मेडिकल कॉलेजमधील परिचारिका देखील कोझिकोडमध्ये अन्न विषबाधामुळे मरण पावली होती.



