Kerala New CM: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी अखेर यूडीएफचे सरकार स्थापन झाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात यूडीएफच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. सतीशन यांच्यासह इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) चे पाच आमदार आणि इतर २० आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेत मंत्रिमंडळात प्रवेश केला. (Kerala New CM) Kerala New CM: दरम्यान , काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसशासित तीन राज्यांचे मुख्यमंत्री केरळमधील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या शपथविधीनंतर केरळमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. (Kerala New CM) केरळमध्ये कोण मंत्री झाले? (Kerala New CM) व्हीडी सठेसन (मुख्यमंत्री), पीके कुनहालीकुट्टी, रमेश चेन्निथला, के मुरलीधरन, सनी जोसेफ, मॉन्स जोसेफ, शिबू बेबी जॉन ,अनूप जेकब ,सीपी जॉन ,एपी अनिल कुमार, एन समसुधीन ,पीसी विष्णुनाथ ,रोझी एम जॉन , बिंदू कृष्ण, एम लिजू,के.एम.शाजी, पीके बशीर, VE अब्दुल गफूर, टी सिद्दीकी, केए तुलसी, ओजे जनिश