Kerala Election 2026 : केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 55 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; भाजपचेही 47 उमेदवार घोषित
Kerala Election 2026 : केरळमध्ये सर्व १४० विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर होतील.

Kerala Election 2026 : केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी वेग दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) ने मंगळवारी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत अनेक वकील, महिला उमेदवार तसेच अनुसूचित जाती व जनजाती राखीव मतदारसंघांसाठीच्या नावांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष लढणार पेरावूरमधून –
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत इरिक्कूरमधून अॅड. सज्जीव जोसेफ, धरमादममधून अब्दुल रशीद, थलास्सेरीमधून अॅड. के.पी. सजू, पेरावूरमधून प्रदेशाध्यक्ष अॅड. सनी जोसेफ, मनन्थवाडी (एसटी) मधून उषा विजयन, सुल्तानबाथेरी (एसटी) मधून अॅड. आय.सी. बालाकृष्ण, कलपेट्टामधून टी. सिद्दीक, नंदापुरममधून के.एम. अभिजित आणि क्विलंडीमधून अॅड. के. प्रवीण कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
UDF first list is out!
AICC has released the first approved list of 55 Congress party candidates for the assembly elections in Keralam. After careful evaluation of people’s choices and needs across all constituencies of the state, we have picked the best leaders to represent… pic.twitter.com/A0baPd9DMx
— Congress Kerala (@INCKerala) March 17, 2026
त्याचप्रमाणे बालुस्सेरी (एससी) मधून व्ही.टी. सोराज, एलाथूरमधून विद्या बालाकृष्णन, कोझिकोड उत्तरमधून अॅड. के. जयंत, निलंबूरमधून आर्यदान शौकत, वांडूर (एससी) मधून ए.पी. अनिल कुमार, थवन्नूर (एससी) मधून व्ही.एस. जॉय, पोन्नानीमधून नौशाद अली, थ्रिथालामधून व्ही.टी. बालराम, कोंगाड (एससी) मधून के.ए. तुलसी, मलम्पुझामधून ए. सुरेश, पलक्कड (एससी) मधून रमेश पिशारोडी, तारूर (एससी) मधून के.सी. सुब्रमण्यम आणि चित्तूरमधून अॅड. सुमेश अचुथन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर प्रमुख उमेदवार –
काँग्रेसने नेम्मारामधून टी. थंकप्पन, अलाथूरमधून के.एन. फेबिन, मनलूरमधून टी.एन. प्रतापन, ओल्लूरमधून अॅड. शाजी जे. कोडांकंदाथ, थ्रिसूरमधून राजन जे. पल्लन, नट्टिका (एससी) मधून अॅड. सुनील लालूर, कैपमंगलममधून टी.एम. नजर, पुतुक्काडमधून के.एम. बाबू राज, चालकुडीमधून सुरेश कुमार जोसेफ, कोडुन्गल्लूरमधून ओ.जे. जनीश, अंगमालीमधून रोजी एम. जॉन, अलुवामधून अनवर सदत्त, परवूरमधून व्ही.डी. सथीसन, एर्नाकुलममधून टी.जे. विनोद, थ्रिक्काकारामधून उमा थॉमस आणि कुन्नाथुनाड (एससी) मधून व्ही.पी. सजीन्द्रन यांना तिकीट दिले आहे.
याशिवाय मुवात्तुपूजामधून डॉ. मथ्यू कुझ्हलनादन, वैकोम (एससी) मधून के. बिनॉम, कोट्टायममधून त्रिवंचुर राधाकृष्णन, पुथुप्पल्लीमधून चांडी ओमन, अरूरमधून शनिमोल उस्मान, चेरथलामधून के.आर. राजेंद्र प्रसाद, हरिपदमधून रमेश चेन्नितला, मेवेलिक्कारा (एससी) मधून अॅड. मुथुरा राज, करुणागपल्लीमधून सी.पी. महेश, कोट्टारक्कारामधून अॅड. पी. महेश पॉटी, पठानापुरममधून ज्योती कुमार चमाकाला, कुंडारामधून पी.सी. विष्णुनाध, कोल्लममधून अॅड. बिंदू कृष्णा, चथन्नूरमधून सूरज रवि, चिरायिन्कीज (एससी) मधून राम्या हरिदास, वट्टियोर्कावूमधून के. मुरलीधरन आणि कोवलममधून एम. विन्सेंट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपनेही ४७ उमेदवार जाहीर केले –
भाजपनेही सोमवारी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन आणि राज्य भाजप अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची नावे आघाडीवर आहेत. चंद्रशेखर हे नीमोम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
९ एप्रिलला मतदान, ४ मेला निकाल –
केरळमध्ये सर्व १४० विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर होतील.





