असे ठेवा “पाणी स्वच्छ”

पाणी ( water )हे जीवन आहे. एकवेळ माणूस अन्नाशिवाय काही काळ राहू शकेल. पण, पाण्याशिवाय फार काळ राहणे अशक्य आहे. जगण्यासाठी इतक्या महत्त्वाच्या घटकाकडे आपण अनेकवेळा दुर्लक्ष करतो.
पण सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. पण, त्याच्या स्वच्छतेची काळजी घेत नाही. त्याचे परिणाम आपल्यावरच होत राहतात. अस्वच्छ पाण्यामुळे सतत आजारपण येणे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. पटकी, विषमज्वर, कावीळ यासारखे घातक रोग होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे हे पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. पाणी ( water ) शुद्ध करूनच वापरले पाहिजे.
पाणी ( water ) वापरण्यापूर्वी…
पाणी ( water ) उकळून घेतल्यास त्यातील सर्व जीवजंतू मरतात. उकळलेले पाणी पिण्यासाठी सुरक्षित असते. त्यामुळे पाणी उकळून व नंतर गाळून प्या.
आपल्याला पाणी ( water ) जिथून मिळते, तिथे स्वच्छतेची यंत्रणा आहे ना, याची खात्री करून घ्या. शहरात अनेक ठिकाणी असे स्वच्छ पाणी ( water ) पुरविले जाते. पण, उपनगरे, खेड्यातून स्वच्छ पाणी ( water ) मिळतेच असे नाही. त्यामुळे जिथून पाणी येते, ते पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहून घ्यायला हवे.
घ्रात आल्यावरही पाणी ( water ) स्वच्छ करून घ्या. त्यासाठी उकळणे, गाळणे याबरोबरच तुरटी फिरवणे, शुद्ध करण्यासाठी क्लोरीनयुक्त गोळ्यांचा किंवा थेंब टाकणे या गोष्टी करता येतील.
घ्रात ज्या ठिकाणी पाणी ( water ) ठेवू, ती जागा स्वच्छ ठेवा.
पाणी ( water ) नेहमी नीट झाकून ठेवा.
-पाण्यात सतत वेगवेगळी भांडी बुडविण्यापेक्षा तोटी असलेली भांडी वापरा. तसे शक्य नसल्यास -पाण्याच्या भांड्यात घालण्यासाठी ओगराळे वापरा.
काही ठिकाणी ज्या विहीर, ओढे, तळ्यातील पाणी ( water ) पिण्यासाठी वापरतात, तिथेच कपडे धुतले जातात. भांडी घासणे, जनावरे धुणे, गाड्या धुणे अशी अनेक कामे तिथे केली जातात. मुळात अशा -ठिकाणचे पाणी ( water ) प्रदूषित असण्याची शक्यता असते. त्यात आणखी प्रदूषण वाढवले जाते. आणि तेच पाणी आपण पित नाही ना, याची खात्री करून घ्या.
विहिरीचे पाणी ( water ) पिण्यासाठी वापरत असल्यास, त्यात टी.सी.एल. घालावे.
-ज्या भांड्यात पाणी ( water ) ठेवले जाते, ते स्वच्छ असावे.
-ज्या टाकीमध्ये पाणी ( water ) साठवले जाते, त्याचीही वेळोवेळी स्वच्छता केली पाहिजे.
-ज्या पाईपमधून पाणी ( water ) येते, ते फुटले नाहीत ना, त्यामध्ये घाण पाणी ( water ) जात नाही ना, हे पाहिले पाहिजे. तसे असल्यास तातडीने दुरुस्ती केली पाहिजे.
-सर्वजनिक ठिकाणी जाताना, शक्यतो बरोबर पिण्याचे पाणी ( water ) घेऊन जावे.





