Kedarnath Dham । उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र केदारनाथमध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक आमदार आशा नौटियाल यांनी ही माहिती दिली आहे. काही बिगर-हिंदू घटक केदारनाथ धामचे पावित्र्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना थांबवण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. बिगरहिंदूंकडून मांस,दारूचे पवित्र ठिकाणी वापर Kedarnath Dham । आमदार आशा नौटियाल यांच्या मते, केदारनाथ धाममध्ये काही बिगर हिंदू लोक मांस, मासे आणि दारू देत आहेत, ज्यामुळे या पवित्र स्थानाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे. त्यामुळे, “अशा लोकांना ओळखून त्यांच्यावर बंदी घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखणे ही आमची प्राथमिकता आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. आशा नौटियाल यांनी पुढे म्हटले, “अलिकडेच राज्याचे प्रभारी मंत्री सौरभ बहुगुणा यांनी केदारनाथमध्ये स्थानिक लोक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत काही बिगर हिंदू लोक केदारनाथ धामला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत हा मुद्दाही प्रमुखतेने उपस्थित करण्यात आला. अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात यावी, असे बैठकीत सुचवण्यात आले. राजकीय पक्ष आणि मानवाधिकार संघटनांचाही प्रश्न Kedarnath Dham । केदारनाथ हे हिंदू धर्माचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत, स्थानिक लोक आणि हिंदू संघटनांचे असे मत आहे की येथील धार्मिक परंपरा काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अनेक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. काही राजकीय पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात की, ‘हे संविधानाच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असू शकते. विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर सरकारकडून स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे. आमदार आशा नौटियाल यांच्या या विधानानंतर, राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर हा प्रस्ताव पुढे गेला तर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर खूप वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे आता सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते आणि केदारनाथमध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर खरोखरच बंदी घातली जाईल का? हे पाहणे गरजेचे आहे.