Kedar Shinde : केदार शिंदेंचा नवा सिनेमा; ‘आई भाड्यानं हवी?’मध्ये दिसणार ‘या’ अभिनेत्री
Kedar Shinde : आपल्या संस्कृतीशी नातं जपणारी आणि सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांना भावणारी कथा

Kedar Shinde : ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाच्या यशानंतर आता केदार शिंदे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘आई भाड्यानं हवी?’ असं सिनेमाचं नाव आहे. नवरात्रीच्या मंगलमय पर्वात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट असणार आहे.
दरम्यान, या सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून यात अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, विशाखा सुभेदार, पायल जाधव आणि प्रार्थना बेहरे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या कलाकारांच्या एकत्रित उपस्थितीमुळे सिनेमाला अधिक रंगत येणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि सनफ्लॉवर स्टुडिओजच्या सहयोगानं तयार होणाऱ्या या चित्रपटातून दैनंदिन आयुष्यातील नातेसंबंधांकडे नव्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
View this post on Instagram
केदार शिंदे दिग्दर्शित आणि ज्योती देशपांडे व सना शिंदे निर्मित ‘आई भाड्याने हवी?’ हा विनोदी, भावनिक आणि नातेसंबंधांची गुंफण असलेला सामाजिक मनोरंजनपट असणार आहे. आपल्या संस्कृतीशी नातं जपणारी आणि सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांना भावणारी कथा सादर करण्याचा या सिनेमाचा प्रयत्न आहे. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार? हे अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र चित्रपटाच्या नावावरून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Box office release : बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश ! एकाच दिवशी ‘इतके’ चित्रपट होणार रिलीज; जाणून घ्या…





