कोपरी पाचपाखाडीमध्ये केदार दिघेंचा पराभव; एकनाथ शिंदेंनी किती मतांनी मिळवला विजय?

Eknath Shinde | ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवार दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे 1 लाख 20 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी केदार दिघे यांचा पराभव केला आहे. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. त्यांच्यासमोर मनसेचे अभिजित पानसे यांचे आव्हान होते. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली होती. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानिमित्ताने ठाण्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी शिंदेंबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या मतदार संघाकडे सर्वांचे लागले होते. Eknath Shinde |
– 2009 च्या निवडणुकीत युतीचे उमेदवार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात काँग्रेसचे मनोज शिंदे, मनसेचे राजन गावंड यांनी निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे यांनी ७६ हजार ५०२ मते मिळवले होते. Eknath Shinde |
तर 2014 च्या निवडणुकीत युती तुटली. सर्वत्र मोदी लाट असतानाही शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी गड मजबूत होता. या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी मताधिक्य ५४ टक्क्यांपर्यंत वाढवले. भाजपचे संदीप लेले, काँग्रेसचे मोहन गोस्वामी, मनसेचे सेजल कदम अशी लढत होती.
– 2019 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना धोबीपछाड करत एक लाख १३ हजार ४९७ मते मिळाली होती. आता 2024 मध्येही एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत.





