Katrina Kaif: कतरिना कैफकडून ट्रोलर्सची बोलती बंद; लंडनमधील खास लुक चर्चेत
Katrina Kaif: विहानच्या जन्मानंतर कतरिनाचं वजन वाढल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं

Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यावर तिच्या वाढत्या वजनामुळे खूप ट्रोल झाली होती. त्यानंतर नुकतीच ती लंडनमध्ये एका खास कार्यक्रमात सहभागी झाली, जिथे तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, लंडनच्या या कार्यक्रमातील तिचा रॉयल अंदाज त्या सर्व ट्रोलर्ससाठी चोख प्रत्युत्तर देणारा ठरला आहे.
कतरिनाचा ब्युटी ब्रँड KayBeauty जगभरात प्रसिद्ध आहे. याच ब्रँडच्या लंडनमधील वर्षपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त तिने लंडनमध्ये उपस्थिती लावली होती. तिचा हा शानदार लूक प्रसिद्ध स्टायलिस्ट रिया कपूरने डिझाइन केला होता. यादरम्यान तिने स्वीडिश लक्झरी ब्रँड ‘टोटोम’चा अर्थी ब्राऊन आऊटफिट परिधान केला होता, ज्यामध्ये तिचा अंदाज अत्यंत क्लासी दिसत होता.
View this post on Instagram
या आऊटफिटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा ब्राऊन रंगाचा स्कर्ट, जो धोती स्टाईलपासून प्रेरित होता. चॉकलेट-ब्राउन ड्रेप स्कर्ट, टेलर ब्लेझर, ब्लॅक टॉप, बेली शूज या लूकमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. कतरिनाने आपला मेकअप एकदम साधा आणि नैसर्गिक ठेवला होता. अवघ्या महिन्याभरात तिचा बदललेला लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
दरम्यान, कतरिना कैफला नोव्हेंबर २०२५ मध्ये मुलगा झाला. विहान कौशलच्या जन्मानंतर कतरिना मीडियापासून दूर होती. मात्र, गणेशोत्सवात कतरिना पती विकी कौशलसह अंबानींच्या घरी पोहोचली होती. विहानच्या जन्मानंतर कतरिनाचं वजन वाढल्याने तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.
हेही वाचा:




