Katrina Kaif : कतरिना कैफ आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसली. प्रेग्नंसी दरम्यान कतरिनाने कॅमेरापासून दूर राहणं पसंत केलं होतं. डिलिव्हरीनंतरही ती कुठे दिसली नव्हती. आता आई झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी कतरिना पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे.
कतरिनाने 7 नोव्हेंबर 2025 ला गोंडस मुलाला जन्म दिला. कतरिना आणि विकी कौशलच्या मुलाचे नाव विहान असे आहे. आई झाल्यानंतर साडेतीन महिन्यांनी कतरिना कैफ स्पॉट झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गेले काही महिने कतरिनाने करिअरमधून ब्रेक घेतला आणि ती बाळावर सर्व लक्ष देताना दिसत आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सोबत स्पॉट झाली आहे. दोघे एकत्र कारमध्ये बसलेल्या दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कतरिना कैफने चेहऱ्याला मास्क लावला आहे. कॅमेरा पाहताच कतरिनाने त्यांना हाय केले. तसेच एक सुंदर स्माइल देते. . कतरिनाच्या बाजूला तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाही बसल्याचं दिसत आहे. यास्मिन ही एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. Katrina Kaif
कतरिना कैफ आणि विकी कौशल 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनी त्यांना बाळ झाले. कतरिना कैफच्या आगामी प्रोजेक्टची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तर विकी कौशल आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात झळकणार आहे. Katrina Kaif
हेही वाचा:
PM Modi in Israel: इस्रायलमध्ये “मोदी मॅजिक “! इस्रायलची संसद तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाली





