ढोल-ताशांच्या गजरात कसबा गणपतीची मिरवणूक
Updated On:

पुणे – श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचे हे 127 वे स्थापना वर्ष असून, यंदा श्रींची प्रतिष्ठापना सकाळी 11.40 या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सत्संग फाऊंडेशनचे संस्थापक, क्रिया योगाचे गाढे अभ्यासक, शिक्षक आणि प्रसारक श्री. एम यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षीही श्रींची प्राणप्रतिष्ठेची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून निघाली आहे. मिरवणुकीत नगारखाना, प्रभात बॅंड, श्रीराम ढोलताशा पथक, संघर्ष ढोलताशा पथक सहभागी झाले आहेत.
मूर्तीकार पार्सेकर यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन सकाळी 9.30 वाजता मिरवणूक निघून ती कुंटे चौक त्यानंतर श्री लिंबमहाराज चौक, आप्पाबळवंत चौक, फरासखाना चौक पुढे लाल महाल चौक येथून साडेअकरा वाजता उत्सव मंडपात येईल. कसबा गणपती मंडळ यावर्षी “गजमहाला’ची सजावट केली आहे.





