Kasba Assembly Bypoll Results Live : अभिजीत बिचकुले यांना पहिल्या फेरीत ४ मते
Updated On:

पुणे – कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेले बिग बॉस फेम उमेदवार अभिजीत बिचकुले यांना पहिल्या फेरीत ४ मते मिळाली. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाचव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी तब्बल तीन हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
Pune, Maharashtra | Counting of votes underway for Kasba Peth by-elections pic.twitter.com/CUp88aRSL3
— ANI (@ANI) March 2, 2023





