Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट
Updated On:

पुणे : भाजपकडून कसबा विधानसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार निश्चित केलेला नसला तरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केसरी वाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली.
रात्री सव्वा नऊच्या सुमारास फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळक यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या भेटीची माहिती शहर पदाधिकाऱ्यांनीही नव्हती.
फडणवीस हे पुण्यात एका कार्यक्रमा निमित्ताने आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईला परत जाताना टिळक यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे कसबा विधानसभा मतदार संघात नेमकी भाजपची भूमिका काय यावरून चर्चांना जोर आला आहे.







