‘कसौटी जिंदगी की 2’ अभिनेत्रीचा पाच वर्षातच मोडला संसार

Sonyaa Ayodhya | ‘कसौटी जिंदगी की 2’ मालिकेतील अभिनेत्री सोन्या अयोध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. सोन्या अयोध्याचा 5 वर्षांचा संसार मोडला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तिच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोन्या अयोध्या आणि हर्ष सामोर यांच्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद वाढला होता. सोन्या अयोध्या आणि हर्षने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली होती. तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवरील एकमेकांसोबत असलेले फोटो देखील हटवले आहेत. मात्र अद्यापही घटस्फोटावर सोन्या अयोध्या कोणतेही भाष्य केले नाही.
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सोन्या अयोध्यानं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केलेली. ज्यामुळे लोकांचा संशय आणखी वाढला होता. सोन्या अयोध्यानं पोस्टमध्ये लिहिलेलं की, “कोणीतरी मला विचारलं, ‘तू तुझी बाजू सांगणार नाहीस का?’ मी उत्तर दिलं, ‘माझी बाजू देवाला माहिती आहे आणि ते पुरेसं आहे.’
सोन्या अयोध्या आणि हर्ष यांचा 2019 जयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर चार वर्ष या दोघांनी सुखी संसार केला. मात्र 2024 पासून त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि तेव्हापासून त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता सोन्याने वयाच्या 29 वर्षी घटस्फोट घेतला आहे. Sonyaa Ayodhya |
हेही वाचा:
फुलेरामध्ये निवडणुकीचा माहोल ! प्रधानजी आणि भूषण आमनेसामने; ‘पंचायत 4’चा पाहा टीझर





