कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनरची 7 वाहनांना जोरदार धडक

नाशिक : नाशिकमधील कसारा घाटात एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात सुमारे 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याचे समजत आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे.
काय घडले नेमके?
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. विकेंडमुळे नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती. त्यातच कसारा घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने कंटनेरने सहा ते सात गाड्यांना धडकला. या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.





