Karuna Sharma : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरात मोटी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडवर आरोप असून तो अटकेत आहे. कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर गदा आली आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला अशी चर्चा आहे. आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा चांगलेच अॅक्टिव्ह झाले होते. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना 250 दिवस मी गप्प राहिलो, जो गुन्हा मी केला नाही, त्याचीही शिक्षा मला भोगावी लागली, असे विधान त्यांनी केले होते. या विधानावर करुणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सगळ्यात मोठी चूक तर…. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल. तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास, असं करुणा शर्मा म्हणाल्या. तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर हे लोकं काम करत होते. आज परळीमध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. आणि तू काय म्हणतोस की, माझी चूक नाही, सगळ्यात मोठी चूक तर तुझीच आहे, असा गंभीर आरोपही करुणा मुंडेंनी केला आहे. थेट इशारा वाल्मीक सारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात धनंजय मुंडे तुझा होता असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व्हाईट कॉलर बनून मोठं भाषण देत आहेस, पण असं चालू देणार नाही, आता मी आहे असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे? 250 दिवस मी गप्प राहिलो, जो गुन्हा मी केला नाही, त्याचीही शिक्षा मला भोगावी लागली. जी संकटं आली, ती अचानक आलेली संकटं होती आणि घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण असते. मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खंत एका कार्यक्रमात भाषण करताना बोलून दाखवली होती. धनंजय मुंडे पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चांगलेच अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या भागात दौरे करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. या अतिवृष्टीचा मोठा फटका मराठवाड्याला देखील बसला. धनंजय मुंडेंनी अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. तसेच ओबींसी आरक्षणाच्या मुद्यावर देखील मुंडे विधानं करत आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. हेही वाचा : कमी बोनस मिळाल्याने कर्मचारी संतापले; असं काही केलं की कंपनीला लाखो रुपयांचा बसला फटका