Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

शेवटचा कसोटी सामना कधी खेळला होता?
३३ वर्षीय करुण नायरने भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथे खेळला होता. २५ ते २८ मार्च दरम्यान खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात नायर सहभागी होता. पण यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. जर आपण आजपासून सुरुवात केली तर त्याने त्याची शेवटची कसोटी २९७९ दिवसांपूर्वी खेळली होती.
इंग्लंडविरुद्ध झळकावलय त्रिशतक –
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
करुण नायरने आतापर्यंतच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी एकूण ६ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७ डावांमध्ये ६२.३ च्या सरासरीने फलंदाजी करत ३७४ धावा केल्या आहेत. नायरने २०१६ मध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले होते. तो ३०३ धावा करून नाबाद राहिला होता.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिलने कर्णधार होताच केला अनोखा पराक्रम! ‘या’ खास यादीत पटकावले पाचवे स्थान
करुण नायरने मानली नाही हार –
भारतीय संघातून वगळल्यानंतर करुण नायरने कधीही हार मानली नाही. त्याने आपली मेहनत सुरुच ठेवली. यानंतर, त्याने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये इतकी चांगली कामगिरी केली की निवडकर्त्यांना त्याच्या नावाचा विचार करावा लागला. विदर्भाकडून खेळताना त्याने संघाला रणजी करंडक जिंकण्यास मदत केली. रणजी ट्रॉफीमध्ये करुण नायरने ९ सामन्यांमध्ये ५३.९३ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात विदर्भाकडून पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या.
हेही वाचा – Mohammad Shami : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीची का नाही निवड? अजित आगरकरांनी सांगितलं कारण
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.





