Special Train : कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त विशेष रेल्वे धावणार
Special Train : कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Special Train : कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत अदिलाबाद ते पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Special Train)
या विशेष रेल्वेच्या ४ फे-या होणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. या विशेष रेल्वेगाडीला कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन २४ डबे जोडण्यात येणार असून भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Special Train)
या विशेष रेल्वेगाड्यांमुळे मराठवाडा, विदर्भातील भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. ही विशेष रेल्वे आदिलाबाद, किनवट, बोधडी बुजुर्ग, सहस्रकुंड, हिमायतनगर, हदगाव रोड, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत धावणार आहे. (Special Train)
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणा-या भाविकांनी या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे. (Special Train)
Train Fire : मोठी बातमी..! धावत्या ट्रेनला भीषण आग, 4 डबे जळून खाक; प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या





