मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये कार्तिक श्रीलीलाची डिनर डेट; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Karthik Aryan | Srileela | गेल्या काही महिन्यांपासून बॅालिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला यांच्या अफेअरच्या चर्चा बीटाऊनमध्ये होत असतात. नुकतीच श्रीलीलाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्तिकने तिला शुभेच्छा देणारी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने श्रीलीलाचा फोटोही शेअर केला होता. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नुकतेच दोघांनाही रात्री उशिरा मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. या दोघांनीही प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनिर केला असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आणि श्रीलीला हे दोघेही दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या ‘आशिकी ३’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या रोमँटिक संगीतमय चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आजकाल हे दोघेही एकत्र दिसत आहेत. दोन्ही स्टार्सनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चा दिवसेंदिवस अधिक गहिऱ्या होताना दिसत आहेत.
हेही वाचा : मार्क झुकरबर्गला ट्रम्पने दाखवला बाहेरचा रस्ता ; ओव्हल ऑफिसमधून जाण्याचे दिले आदेश, का दिला असा आदेश? वाचा





