कार्तिक आर्यनने शेअर केला श्रीलीलासोबतचा फोटो; चित्रपटाबाबत चाहत्यांची वाढली उत्सुकता

Kartik Aaryan | बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिकसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलाला दिसणार आहे. नुकताच कार्तिकने श्रीलीलासोबत एक खास फोटो सोशल मिडिया शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि श्रीलीला आरशामध्ये पाहताना दिसत आहेत. श्रीलीलाच्या चेहऱ्यावर एक हास्य दिसत आहे. तर कार्तिक ‘आशिकी 3’ च्या खास लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोला त्याने एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, “एका दीर्घ वेळापत्रकाचा शेवटचा समाधानकारक दिवस. #दिवाळी 2025.” ‘आशिकी 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Kartik Aaryan |
View this post on Instagram
हा फोटो हे पाहून लोकांनी कमेंट्स सुरू केल्या की आता दिवाळीची वाट पाहू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिले की, ‘तुम्हाला रोमँटिक हिरोच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ Kartik Aaryan |
आशिकी’ चित्रपट 1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ‘आशिकी 2’ 2013ला रिलीज झाला. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली. आता ‘आशिकी 3’ या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात प्रथमच कार्तिक आणि श्रीलीला यांची जोडी पाहायला मिळणार आहे. Kartik Aaryan |
हेही वाचा:





