“फ्रेडी’साठी कार्तिकने वाढवले 14 किलो वजन!

आपण नेहमीच चित्रपटात अभिनेत्यांनी भूमिकेसाठी शरीर कमावले किंवा वजन घटवले अशा कथा ऐकतो. मागे आमीर खानने असे केले होते आणि आता कार्तिक आर्यननेदेखील असेच काहीसे केले आहे. जवळपास 10 दिवसांच्या रेकॉर्ड वेळेत आपला चित्रपट “धमाका’ पूर्ण केल्यानंतर या अभिनेत्याने “फ्रेडी’साठीदेखील असेच काहीसे जबरदस्त केले. कार्तिकने जवळपास 12 ते 14 किलो वजन वाढवले आहे.
“फ्रेडी’ हा एक रोमांटिक थ्रिलर असून, अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्सने पुरेपूर असा चित्रपट आहे. जेव्हा कार्तिकला त्याच्या फ्रेडीमधील व्यक्तीरेखेसाठी वजन वाढवण्याची गरज सांगण्यात आले तेव्हा त्याने यासाठी लगेचच तयारी दर्शवली.
कार्तिकने आपल्या व्यक्तीरेखेच्या आवश्यकतेसाठी आपला ट्रेनर समीर जौरासोबत आपल्या शरीरावर काम करणे सुरू केले. समीरला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमधील तज्ज्ञ मानण्यात येते आणि त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.





