कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चे शूटिंग सुरू; कबीर खानसोबतचा शेअर केला फोटो

मुंबई – अभिनेत्री कार्तिक आर्यन अगदी कमी वेळात प्रसिद्धी झोतात आला आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अशातच कार्तिकने आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. इनस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे.
कार्तिकने इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिग्दर्शक कबीर खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले, “माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि रोमांचक प्रवासला सुरूवात झाली आहे.” दरम्यान कार्तिकच्या या पोस्टमुळे त्याने आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’चे शूटिंग सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अद्याप या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव समोर आलेले नाही. मात्र, यात श्रद्धा कपूरला साइन इन केल्याचे म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
तसेच कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो. दरम्यान, अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे. कियारा आणि कार्तिकच्या जोडीने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सत्यप्रेम चित्रपटाची कथा हिट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात 100 कोटींचा आकडा पार केला आहे.





