कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैय्या ३’च्या सेटवरील शेअर केला भयावह अनुभव

Bhool Bhulaiya 3 | अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या ३’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवरील एक भयानक अनुभव कार्तिक आर्यनने शेअर केला आहे.
या सिनेमाचं शूटिंग एका जुन्या हवेलीत झाले आहे. तेथील अनुभव शेअर करताना कार्तिक म्हणाला, “आम्ही जिथे शूट करत होतो ती एक मोठी हवेली होती. सगळीकडे अंधार होता त्यामुळे भीतीदायक वातावरण होतं. माझ्या सीनच्या आधी मी कोणाशी तरी बोलत होतो. तेव्हाच कोणीतरी माझ्या पाठीवर ओरखडल्याचं मला जाणवलं. तृप्तीला वाटलं की मी सीनच्या अगोदर अॅक्टिंग करतोय किंवा इम्प्रोवाइज करतोय. तेव्हा मी तिला सांगितलं की कोणीतरी मला पाठीवर स्क्रॅच केल्याचं जाणवलं. पण, आमच्या पाठीमागे मात्र कोणीच नव्हतं”. Bhool Bhulaiya 3 |
दरम्यान, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35.5 कोटींची कमाई केली. शनिवारी दुसऱ्या दिवशी कमाईत 4.23 टक्क्यांनी वाढ झाली असून चित्रपटाने 37 कोटींची कमाई केली आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 33.5 कोटी कमावले. या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण 106 कोटींची कमाई केली आहे. Bhool Bhulaiya 3 |
‘भूल भुलैया’चा पहिला भाग 2007 मध्ये रिलीज झाला होता. त्यात अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल, शायनी आहुजा सारखे स्टार्स दिसले. तर दुसऱ्या भागात अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसली. आता तिसऱ्या भागात विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा :
“देर आये दुरुस्त आये…”; मनोज जरांगेंच्या निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत





