‘प्यार का पंचनामा 3’ चित्रपटातून कार्तिक आर्यन आऊट ?

Bollywood News ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग बनवणार आहे. या भागात कार्तिक आर्यन आर्यन दिसणार नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. सोशल मीडियावर कार्तिक या चित्रपटाचा भाग होणार नाही का ? असा प्रश्नही विचारला जात आहे.
या चित्रपटाच्या मालिकेवर कार्तिक आर्यनने आपल्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकने केलेला अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी क्वचितच कोणी करू शकेल. पण आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचा विचार केला तर त्यात तुम्हाला कार्तिक दिसणार नाही.
चित्रपटाच्या तिसऱ्या भागात आधुनिक नातेसंबंधांना कसे सामोरे जायचे हे दाखवणार आहे. पण यावेळी नवीन कलाकार आणि नवीन पात्रे असतील, जेणेकरून चित्रपटाला एक नवीन चव देता येईल. यावेळी निर्मात्यांनी नवीन कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा विचार केला आहे, जेणेकरून ते प्रेक्षक आणि नवीन पिढीशी जोडले जातील.मात्र चाहते कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसावा, अशी मागणी करत आहे. यावर आता चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यावरच करणार आहे.
दरम्यान, कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैया 3’ साठी चर्चेत आहे. याआधी हा अभिनेता ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात दिसला होता, जो पॅरालिम्पिक बायोपिक होता. यामध्ये कार्तिकचा फिटनेस पाहण्यासारखा होता.





