५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून हत्या ; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार

Karnataka Police Encounter । कर्नाटकातील हुबळी याठिकाणी ५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. ही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रितेश कुमारला पकडले असता त्याने पोलिस पथकावर हल्ला केला. पोलिसांनी त्याला आधी इशारा दिला, पण तरीही तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता म्हणून पोलिसांना प्रत्युत्तर म्हणून गोळीबार करावा लागला. या चकमकीत एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला. रितेश कुमारविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी बिहारचा रहिवासी Karnataka Police Encounter ।
हुबळी पोलीस प्रमुख शशी कुमार यांनी, “नितेश कुमार हा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता. पोलिस त्याला ओळख पटवण्यासाठी त्याच्या घरी घेऊन जात असताना त्याने पोलिस पथकावर हल्ला केला.” असे सांगितले.
पुढे ते म्हणाले, “यादरम्यान त्याने पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान केले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला रोखण्यासाठी हवेत गोळीबार केला, पण तरीही तो पळू लागला. यानंतर त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.” उपनिरीक्षक अन्नपूर्णा यांनी आरोपीवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर महिला पोलिस अधिकारी आणि इतर टीमने त्याला पुन्हा पकडले.
या घटनेनंतर स्थानिक लोक संतप्त Karnataka Police Encounter ।
नितीश कुमारने मुलीचे अपहरण करून हत्या केल्यामुळे परिसरात संताप पसरला आहे. हुबळीतील अशोक नगर पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले आणि न्यायाची मागणी करू लागले. पीडित मुलीचे कुटुंब कोप्पल जिल्ह्यातील आहे. तिची आई घरकाम करते आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करते, तर तिचे वडील रंगकाम करतात.
रिकाम्या इमारतीत सापडला मुलीचा मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई तिला सकाळी कामावर सोबत घेऊन गेली होती. ती जवळच्या घरात काम करते. काम सुरू असताना, एका अज्ञात व्यक्तीने मुलीला तेथून पळवून नेले. काही काळानंतर ती मुलगी बेपत्ता झाली. कुटुंबाने तिचा शोध सुरू केला आणि काही वेळाने ती जवळच्या रिकाम्या इमारतीत सापडली, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. आरोपीपर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले.





