illegal gratification case : कर्नाटकमधील भाजपच्या आमदाराला अटकपूर्व जामीन मंजूर

बंगळुरू :– कर्नाटकमधील भाजपचे आमदार मदल विरूपक्षप्पा (Madal Virupakshappa) यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ते एका कंत्राट घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. कर्नाटक सोपस् अँड डिटर्जंटस् (केएसडीएल) कंत्राट घोटाळ्यावरून विरूपक्षप्पा अडचणीत आले आहेत.
केएसडीएलला रसायन पुरवण्यासाठी एका कंत्राटदाराकडे 81 लाख रूपयांची लाच मागण्यात आली. त्यातील 40 लाख रूपये स्वीकारताना विरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत याला लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्रशांतच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले.
त्या कारवाईवेळी तब्बल 8 कोटी 23 लाख रूपयांची रोकड सापडली. त्या घडामोडींमुळे कर्नाटकात राजकीय वादळ उठले आहे. मात्र, संबंधित घोटाळ्याशी कुठलाही संबंध नसल्याची भूमिका घेत विरूपक्षप्पा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/contracts-for-procurement-of-70-htt-40-basic-trainer-aircraft-from-hal-three-cadet-training-ships-from-lt-signed-in-the-presence-of-raksha-mantri-shri-rajnath-singh-in-new-delhi/
न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांना तपास अधिकाऱ्यापुढे हजर होण्यास सांगितले. कंत्राट घोटाळ्यात नाहक गोवण्यात येत असल्याचा दावा विरूपक्षप्पा करत आहेत.





