Cauvery water : कावेरीचे पाणी कर्नाटक सरकारने सोडावे; तामिळनाडूच्या याचिकेवर सुनावणी
कमी पावसाच्या वर्षात तामिळनाडूला कावेरी नदीच्या पाण्याचा योग्य वाटा मिळत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

Cauvery water : कावेरी नदीचे तामिळनाडूच्या वाट्याचे पाणी कर्नाटक सरकारला तात्काळ सोडण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर १३ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांच्या युक्तिवादाचा विचार केला. कमी पावसाच्या वर्षात तामिळनाडूला कावेरी नदीच्या पाण्याचा योग्य वाटा मिळत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला.
सरन्यायाधीश म्हणाले, आम्ही गुरुवारी यावर सुनावणी घेऊ. सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने, कर्नाटकला तामिळनाडूच्या वाट्याचे कावेरीचे पाणी तात्काळ सोडण्याचे निर्देश देण्याची मागणी करत, ३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.





