करिश्मा कपूरने ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर धरला ठेका; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Karishma Kapoor | अभिनेत्री करिश्मा कपूरच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘ दिल ले गई ले गई’ या गाण्याची आजही तितकीच क्रेझ पाहायला मिळते. नुकतेच करिश्माने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यात तिने ‘दिल ले गई ले गई’ या गाण्यावर ठेका धरला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करिश्मा कपूर एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर ठेका धरला. अभिनेत्रीला नाचताना पाहून उपस्थित सगळेच थक्क झाले होते. करिश्माच्या या गाण्यानेच नव्हे तर, ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाने देखील एक काळ गाजवला होता. आजही तिची ऊर्जा आणि अदा पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
करिश्माचा जबरदस्त डान्स पाहून एका चाहत्याने लिहिले आहे, ‘एकदम हिऱ्यासारखी चमकत आहेस,’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘काय अप्रतिम नृत्य आहे.’ आणखी एक कमेंट करत लिहिले की, ‘अप्रतिम करिश्मा, वर्षे निघून गेली तरी आजही तोच जलवा आहे.’ Karishma Kapoor |
‘दिल तो पागल है’ हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात करिश्मासोबत माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान होते. यश चोप्रा दिग्दर्शित यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट त्याकाळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. तसेच, याने तीन राष्ट्रीय आणि सात फिल्मफेयर पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळवले होते. अलिकडेच करिश्मा 2024 मध्ये ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात दिसली होती. Karishma Kapoor |
हेही वाचा :
आधी हल्ला केला आता भीतीनं कापरं फुटलं ; पाकिस्तानी हवाई दल ‘हायअलर्ट’वर





