Karishma Tanna Workout : गरोदरपणात करिश्मा तन्नाचा वर्कआउट; चाहत्यांनी दिला मोलाचा सल्ला
Karishma Tanna Workout : व्हिडिओत करिश्माचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत असून तिने केलेला वर्कआउट पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Karishma Tanna Workout : अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. यादरम्यान तिने जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जड डंबेल्स उचलताना दिसते, तसेच वेटलिफ्टिंग करत आहे.
या व्हिडिओत तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत असून तिने केलेला वर्कआउट पाहून चाहते थक्क झाले आहेत. एकीकडे काहींनी करिश्माचे कौतुक करत तिला गर्भवती महिलांसाठी प्रेरणा म्हटले आहे, तर दुसरीकडे काही युजर्सनी तिला इतका धोका न पत्करण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
जिम व्हिडिओ पाहून युजर्सची चिंता
४२ वर्षीय करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत गर्भवती महिलांना उद्देशून लिहिले की, “चला वर्कआउट करूया, मी जिममधील व्हिडिओ पोस्ट करणं खूप मिस करत होते,” असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.
View this post on Instagram
परंतु अनेक नेटकऱ्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने कमेंट् करत लिहिले, “अशी काय मजबुरी आहे? आधी बाळाची काळजी घ्या.” तर दुसऱ्या युजरने, “पहिल्या बाळाच्या वेळी इतका धोका पत्करणं चुकीचं आहे, तेही वयाच्या ४२-४३ व्या वर्षी,” असे लिहिले आहे. Karishma Tanna Workout
दरम्यान, करिश्मा तन्नाने ६ एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियावर पती वरुण बंगेरासोबत फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने सांगितले की, ऑगस्ट २०२६ मध्ये तिची डिलिव्हरी होणार आहे.
करिश्मा आणि व्यावसायिक वरुण बंगेरा यांचा विवाह ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला होता. या दोघांची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती आणि त्यानंतर वरुणने तिला दुबईमध्ये प्रपोज केले होते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. Karishma Tanna Workout
हेही वाचा:





