आयपीएल स्पर्धेदरम्यान पोलार्डचा धक्कादायक निर्णय
Updated On:

मुंबई – वेस्ट इंडीजचा अष्टपैलू व धडाकेबाज फलंदाज कॅरन पोलार्ड याने बुधवारी(दि.20) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून तो सध्या खेळत असून याच स्पर्धेदरम्यान त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडीजकडून पोलार्ड 15 वर्षे खेळला आहे. त्याने 123 एकदिवसीय सामने खेळताना 2 हजार 706 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत 55 बळी घेतले आहेत. त्याने 101 टी-20 सामन्यात 1 हजार 568 धावा केल्या आहेत. त्याने आपला अखेरचा सामना यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात भारताविरुद्ध खेळला होता. देशात मोठी गुणवत्ता असून युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचे पोलार्डने सांगितले आहे.





