करिना – करिष्माचे पहिल्यांदाच फोटोशूट

Updated On:
Photo 1

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर-खान ही प्रेग्नेंट आहे; परंतु या दिवसांमध्येही बेबो सातत्याने काम करताना दिसून येत आहे. करिना नुकतेच बांद्रा येथे फोटोशूट करताना दिसली होती. विशेष म्हणजे, या फोटोशूटवेळी करिष्मा कपूरही तिच्यासोबत होती आणि दोघींनीही एकसारखे कपडे घातलेले होते.

करिना आणि करिष्मा कपूर यांनी आतापर्यत कोणत्याही चित्रपटात एकत्रित काम केलेले नाही. परंतु आता एका प्रोजेक्‍टमध्ये या दोन्ही बहिणी एका फ्रेममध्ये झळकणार आहेत. या फोटोशूटबाबत अद्याप अधिक माहिती मिळाली नाही. पण या दोघी जणी कमर्शियलसाठी एकत्रित आल्या आहेत.

याबाबतची करिष्माने इंस्टाग्रामवर हिंट दिलेली आहे. तिने एक बूमरॅंग व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, बहिणीसोबत काम करताना कधीही चांगलेच वाटते. यासोबतच तिने इशहळपव ढहश डलशपश हॅशटॅग केला आहे. यावरून दोघी एका प्रोजेक्‍टमध्ये झळकणार असल्याचे स्पष्ट होते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास करिनाने नुकतेच “लाल सिंह चढ्‌ढा’चे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिका साकारत आहे.

दरम्यान, बॉलीवूडमधील करिनाच्या कारकिर्दीला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने अभिषेक बच्चनसोबत “रिफ्यूजी’ चित्रपटातून 2000 मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.

आणखी संबंधित बातम्या

Hemant Dhome : "तू चाल पुढं…"; बायकोचा ‘दायरा’तील अभिनय पाहून हेमंत ढोमे भारावला, पोस्टमधून केले 'हे' आवाहन

Hemant Dhome : "तू चाल पुढं…"; बायकोचा ‘दायरा’तील अभिनय पाहून हेमंत ढोमे भारावला, पोस्टमधून केले 'हे' आवाहन

Kareena Kapoor : "‘ॲनिमल’ हिट झाला म्हणून सगळेच..."; करीनाने दाखवला बॉलिवूडला आरसा, व्यक्त केलं परखड मत

Kareena Kapoor : "‘ॲनिमल’ हिट झाला म्हणून सगळेच..."; करीनाने दाखवला बॉलिवूडला आरसा, व्यक्त केलं परखड मत

Kareena Kapoor : ‘हील्स घातल्या आहेत मी...’; पापाराझींवर संतापली करीना, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Kareena Kapoor : ‘हील्स घातल्या आहेत मी...’; पापाराझींवर संतापली करीना, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी