“प्रत्येकाने आनंदी आणि…” करिनाने सांगितले नवीन वर्षांतील संकल्प

मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड स्टार्स देखील सज्ज झाले आहेत. कोणी पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहे तर कोणी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा विचार करत आहे. अभिनेत्री करीन कपूरने देखील नवीन वर्षाचा आपला गोल काय असणार,नवीन वर्षाचे प्लॅन्स नेमकं कसे असणार याबाबत भाष्य केलं आहे.

करिना ही तिच्या अभिनयासह बॉलिवूडमध्ये ट्रेंड सेटर म्हणून देखील ओळखली जाते. करीनाच्या स्टाईलपासून ते हेल्थबाबतच्या कित्येक गोष्टी अनेकजण फॉलो करताना दिसतात. नवीन वर्षानिमित्त करिनाने आपले प्लॅन्स काय असणार हे एका मुलाखती दरम्यान सांगितले. यावेळी तिने तिच्यासह कुटुंबियांच्या अभिनय करिअरबाबत काही गोष्टी देखील शेअर केल्या.
करीना म्हणते, माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. माझ्या वडिलांनी म्हणजेच रणधीर कपूर आणि काका ऋषी कपूर यांचा इंडस्ट्रीतील प्रवास खूप वेगळा आहे. तस माझा आणि करिश्माचा प्रवास देखील वेगळा आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने आपला आपला मार्ग निवडला आणि यश मिळवल असल्याचे करिनाने यावेळी स्पष्ट केले. तसेच नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत बोलताना ती म्हणाली,प्रत्येकजण नवीन वर्षात काही ना काही मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येकाने आनंदी आणि समाधानी राहण्याचा संकल्प केला पाहिजे. तसेच मला नवीन वर्षात कुटुंब आणि कामातील समतोल साधायचा असल्याचे देखील करीनाने यावेळी सांगितले. नवीन वर्षानिमित्त कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देऊन आणखी आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे असंही करीना यावेळी म्हणाली.





