अभिनेता अक्षय कुमारने करीना कपूरच्या बाबतीत केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

बॉलिवूडमध्ये खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने करीना कपूरच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. गुड न्यूज सिनेमात करिना कपूरनं अक्षय कुमारच्या पत्नीची भुमिका केली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अक्षय कुमार आणि करीना यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकमेकांबद्दल सांगण्यासाठी खूप सारे किस्से आहेत. यादरम्यान अक्षय कुमारने करीनाच्या बाबतीत एक शॉकिंग खुलासा केला आहे.
काय केला खुलासा?
गुड न्यूज सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आणि अक्षय कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. तेव्हा अक्षय कुमारनं करीना माझ्यावर शुटींग दरम्यान थुंकली असा खुलासा केला.कपिलनं अक्षय कुमारला विचारलं की, शुटींग दरम्यान करीना तुझ्यावर खूपदा थुंकली ज्यामुळे तुला सतत मेकअप करावा लागला. यावर अक्षय कुमार म्हणाला, “हो हे खरं आहे”.
काय आहे तो किस्सा?
गुड न्यूज सिनेमात डिलिव्हरीचा एक सीन आहे तेव्हा हे झालं होतं. या सीनमध्ये करिनाला मोठ्यानं ओरडायचं होतं. ती हा सीन करत असताना माझ्यावर सतत थुंकत होती. तिला ही ते कळत नव्हतं.”अक्षय पुढे म्हणाला, “ती तिची नख खाते. त्यावर करिना म्हणाली, हो, माझी आई माझ्या नखांवर मिर्ची पावडर लावायची जेणेकरून मी नख खाणार नाही. पण मी आजवर ती सवय मोडू शकले नाहीये”.





