Kareena Kapoor Khan – करीना करतेय दिवाळीचा फराळ ‘एन्जॉय’

Kareena Kapoor Khan – संपूर्ण देश उत्सवाच्या रंगात रंगला आहे. देशभरात दिवाळी सण साजरा केला जातोय. सेलेब्स देखील या शुभ दिवसाची जोरदार तयारी करत आहे.अशात काही स्टार सोशल मीडियावर दिवाळीचे अपडेट शेअर करत आहे अशात अभिनेत्री करीना कपूर खानने सुद्धा घरात बसून दिवाळीचा फराळ एन्जॉय करतानाच फोटो शेअर केला आहे.
करीना कपूर खान घरात बसून दिवाळीचा आनंद लुटत आहे, तिने चाहत्यांसोबत याबाबतचा फोटो शेअर केला आहे. करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये करीनाचा देसी स्नॅक म्हणजेच एक कप चहा आणि नमकीन दिसत आहे. या फोटोसोबत करिनाने लिहिले आहे- ‘इट्स दिवाळी टाईम्स’ या फोटोवर तिच्या फॅन्सनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
याआधी करिनाने तिच्या आगामी सिंघम अगेन या चित्रपटातील तिचा जबरदस्त लुक इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये चेहऱ्यावर करीन स्टंट करतांना दिसत आहे. करिनाचा हा लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करीना कपूरचा सिंघम अगेन पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणहीच्या धासू अवतारात दिसणार आहे. याशिवाय बेबो हंसल मेहताच्या द बकिंगहॅम मर्डर्समध्येही दिसणार आहे. या चित्रपटातून करीना निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. या दोन्ही चित्रपटात करीना पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.





