Shahid kapoor and Kareena kapoor | अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर बऱ्याच वर्षानंतर एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दोघेही एकत्र एकमेकांशी गप्पा मारताना दिसल्याने चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला होता. ‘जब वी मेट’ या चित्रपटानंतर अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचं ब्रेकअप हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्यानंतर दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यात रमले होते. मात्र आता ‘जब वी मेट’ सिनेमासाबाबत एक माहिती समोर आली आहे. निर्मात्यांनी करिनाला ‘जब वी मेट’ सिनेमासाठी विचारलं तेव्हा तिने नकार दिला होता. तिला स्क्रिनवर हटके अशी भूमिका करायची होती. यासाठी करीनाने दीड वर्षे ब्रेक घेतला होता. दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा दुसराच सिनेमा होता, त्यामुळेतिला शंका होती. पण शाहिदनं तिला नंतर समजावलं आणि ती या सिनेमासाठी तयार झाली. पण सिनेमाचे शूटिंग संपेपर्यंत दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले. Shahid kapoor and Kareena kapoor | ऑक्टोबर २००७ साली रिलीज झालेला ‘जब वी मेट’ हा दिग्दर्शक इम्तियाज अलीचा दुसरा चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दरम्यान, शाहिद कपूर आणि करीना कपूर खान एकेकाळी दोघे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी ‘फिदा’, ‘चुप चुपके’ आणि ‘जब वी मेट’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. Shahid kapoor and Kareena kapoor | त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असायचे. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. हेही वाचा: जय पवारांच्या साखरपुड्याच्या ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार भडकले; म्हणाले “हा काही प्रश्न आहे…”