खाकीतील माणुसकीचं दर्शन! करौली हिंसाचारादरम्यान धाडसी पोलिसाने वाचवले 3 जणांचे प्राण; देशभरातून कौतुक

राजस्थानमधील करौली हिंसाचारात खाकीतील माणुसकीचे दर्शन बघायला मिळाले आहे. एका पोलीस हवालदाराचे धाडस दाखवत तीन जणांचे जीव धोक्यात घालून प्राण वाचवले आहे. हिंसाचारादरम्यान लागलेल्या आगीत दोन महिला आणि एक निष्पाप बालक अडकल्याचे लक्षात येताच या हवालदाराने जीवाची पर्वा न करता तिघांनाही बाहेर काढले. एकीकडे हिंसाचार सुरु असताना दुसरीकडे माणुसीकीचे दर्शन घडले आहे. या धाडसी हवालदाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचे देशभरातून कौतुक होताना दिसून येत आहे.
"तम में प्रकाश हूँ,
कठिन वक़्त की आस हूँ।"
So proud of constable Netresh Sharma of Rajasthan Police for saving a precious life. This picture is in deed worth a thousand words.. pic.twitter.com/U2DMRE3EpR— Sukirti Madhav Mishra 🇮🇳 (@SukirtiMadhav) April 4, 2022
नेत्रेश शर्मा असे या धाडसी हवालदाराचे नाव असून ते करौली शहर चौकीवर हवालदार म्हणून तैनात आहेत. करौली शहरात हिंसाचार उसळल्यानंतर पोलिसांना पाचारण आले होते. दरम्यान नेत्रेश यांची नजर फुटा कोट परिसरात आग लागलेल्या एका दुकानावर पडली. दुकानामध्ये दोन महिला आणि एक निष्पाप बालक अडकल्याचे नेत्रेश यांना दिसले. यावेळी जीवाची पर्वा न करता नेत्रेश यांनी दुकानात शिरत तिघांनाही बाहेर काढले. दरम्याना आगीत अडकलेल्या बालकाला नेत्रेश यांनी छातीशी घेऊन धावत दुकानातून सुखरुप बाहेर काढले.
दरम्यान, नेत्रेश यांच्या धाडसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले व बक्षीस म्हणून नेत्रेश यांना बढती देऊन त्यांची हेड कॉन्स्टेबल पदी नियुक्ती केली .
राजस्थानमध्ये हिंदू नववर्षानिमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती ही बाईक रॅली मुस्लीम वस्तीतून जात असताना यावेळी काही उपद्रवींनी बाईक रॅलीवर दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. दंगलखोरांनी दुकाने पेटवली व हिंसाचार उसळून आला आहे. या पार्श्वभूमीवर करौलीमध्ये 7 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.





