मुंबई – दिग्दर्शक करण जोहरचा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. येत्या 28 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर सध्या हे गाणं धुमाकूळ घालत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या गाण्यावर रिल्स बनवत आहे. अशातच बालकलाकार मायरा वायकूळने या गाण्यावर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.
मायराच्या या व्हिडीओची भूरळ चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहराला देखील पडली आहे. करणने मायराचा हा व्हिडीओ स्टोरीवर रिशेअर केला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रिल शेअर केली. ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर मायरा सुंदर डान्स करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. या व्हिडीओत मायराने लाल टॉप, काळा लेहेंगा आणि ओढणी असा लूक केला आहे. यातील तिचे गोड नखरे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत बालकलाकार मायरा प्रमुख भूमिकेत होती. मालिकेत मायराने परीचे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियात मिळाली. सध्या मायरा कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ सोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.