Karad : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात
Karad : मतदान 21 जूनला होणार

संजय पाटील
Karad : – राज्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. सोमवार, दि. 18 मे पासून निवडणूक अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर मतदान 21 जूनला होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असून 47 हजार 145 सभासद असून राज्यातील सर्वात मोठा सभासद संख्या असलेला सहकारी साखर कारखाना आहे. भाजपाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलची सत्ता असून विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे नेते अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते या यावेळी संस्थापक पॅनलचे नेतृत्व करणार आहेत.
सद्यस्थितीला कृष्णा कारखान्यात दुरंगी लढतीचे संकेत मिळत असले तरी कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते नक्की काय भूमिका घेणार, यावर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सातारा सांगली जिल्ह्यातील सभासदांचे तसेच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:





