Karad News : कराडजवळ महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी; पाचवड फाट्यावरील घटना
पुणे- बंगळुरू महामार्गावर नांदलापूर हद्दीतील पाचवड फाटा (ता. कराड) येथे शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत (Karad News) बिबट्या जखमी झाला.

Karad News : पुणे- बंगळुरू महामार्गावर नांदलापूर हद्दीतील पाचवड फाटा (ता. कराड) येथे शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत (Karad News) बिबट्या जखमी झाला. मॅकडोनाल्डसमोर घडलेल्या या घटनेत बिबट्याच्या मागील दोन्ही पायांना दुखापत झाली असून धडकेनंतर तो जवळील उसाच्या शेतात निघून गेला.
दुखापतग्रस्त बिबट्या मागील पाय फरपटत उसाच्या शेतात जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Karad News) झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तो अद्याप आढळलेला नाही.
जखमी अवस्थेतील बिबट्या उसाच्या शेतात लपल्याची शक्यता असल्याने वन विभागाकडून परिसरात ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत जखमी बिबट्याचा शोध लागला नव्हता. महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांमध्येही शेतात गेल्यावर बिथरलेल्या अवस्थेतील जखमी बिबट्या हल्ला करण्याची (Karad News) भीती निर्माण झाली आहे.






