Karad News : इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
इंडियन बँकेच्या येथील शाखेतील अधिकारी रविकिरण केशव लाडे (मूळ रा. मुरुड, ता. जि. लातूर) यांनी आगाशिवनगर- मलकापुर (ता. कराड) येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन (Karad News) आत्महत्या केली.

Karad News : इंडियन बँकेच्या येथील शाखेतील अधिकारी रविकिरण केशव लाडे (मूळ रा. मुरुड, ता. जि. लातूर) यांनी आगाशिवनगर- मलकापुर (ता. कराड) येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन (Karad News) आत्महत्या केली.
याप्रकरणी त्यांचे बंधु अक्षय केशव लाडे (वय 32, रा.) यांनी फिर्याद दिली असून उपक्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बॅंकेच्या येथील शाखेत रवीकिरण लाडे अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आगाशिवनगर येथील फ्लॅटमध्ये शुक्रवारी आत्महत्या केली.
फिर्यादीत (Karad News) उपक्षेत्रीय अधिकारी मैथेली शरण सावला व क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांनी माझा मृत भाऊ रविकिरण यास सुट्टी देत नव्हते, मिंटीगमध्ये अपमानस्पद वागणुक देत होते, कर्मचा-यांसमोर अपमान करत होते, ऑफिसचे टारगेट पूर्ण करुन सुध्दा घालून पाडून बोलत होते, विनाकारण मानसिक त्रास देत होते.
म्हणून रविकिरण याने त्यांच्या त्रासाला कंटाळून भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांनी (Karad News) सुरु केली आहे.






