Karad News : पहाटेचा थरार! कराडच्या मोबाईल शॉपीवर डल्ला; शटर तोडून 50 लाखांचा मुद्देमाल लंपास
कराड शहरात शनिवारी पहाटे एका धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसर (Karad News) हादरून गेला आहे.

Karad News : कराड शहरात शनिवारी पहाटे एका धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसर (Karad News) हादरून गेला आहे. मोहिते हॉस्पिटलच्या परिसरातील ‘एस. एस. मोबाईल शॉपी’वर भल्या पहाटे अज्ञातांनी डल्ला मारत तब्बल ५० ते ६० लाख रुपयांचे सुमारे ३०० महागडे मोबाईल संच लंपास केले.
पहाटेच्या शांततेचा फायदा घेत एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार दुकानासमोर येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या चार चोरट्यांनी क्षणात दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काही मिनिटांतच दुकानातील किमती मोबाईलचे बॉक्स कारमध्ये भरून हे चौघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच (Karad News) पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयित स्विफ्ट कारच्या दिशेने तपास वेगाने सुरू केला आहे.
आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी (Karad News) पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. नेमके किती नुकसान झाले याचा अधिकृत आकडा पंचनाम्यानंतर समोर येईल, मात्र या फिल्मी स्टाईल चोरीमुळे कराडमधील व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.





