नागठाणे, (प्रतिनिधी) – कराड उत्तरमधून भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मनोज घोरपडे यांचे पक्ष बांधणीतील कार्य आणि योगदानाची दखल घेत मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीची एकमुखी जोरदार मागणी केली आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या जागा वाटपाच्या धर्तीवर कराड उत्तर विधानसभा मतदार संघही महायुतीने भारतीय जनता पार्टीच्या वाटयाला सोडवून घ्यावा व यावेळी विजयाची पक्की खात्री असलेले कराड उत्तरचे निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी केली आहे. मनोज घोरपडे हे कराड उत्तर मतदार संघात गेली बारा वर्षे भाजपच्या माध्यामातून कार्यरत असून त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये भाजपला व पर्यायाने कमळ चिन्हाला पोहचवण्याचे काम नियोजनबध्द व अतिशय ताकदीने केले आहे. कराड उत्तरमधील अनेक प्रलंबित प्रकल्पांसह शेती सिंचनाचा प्रश्न सोडवला आहे. अनेक सिंचन प्रकल्पातील पाणी वंचित गावांसाठी आरक्षीत केले आहे. कराड उत्तरमधील ‘गाव तिथे विकास काम’ आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मनोज घोरपडे तत्पर राहीले आहेत. पक्षकार्याला अहोरात्र वाहून घेऊन चोवीस तास जनतेसाठी उपलब्ध राहीहिले. त्यामुळे यावेळी कराड उत्तर मतदार संघ भाजपच्या पारडयात घेऊन प्रबळ दावेदार मनोज घोरपडे यांनाच उमेदवारी दिल्यास महायुतीला दादांच्या रूपाने एक आमदार नक्कीच मिळणार आहे. त्याच्या विजयासाठी आम्ही पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध काम करु अशी, ग्वाही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली आहे. समन्वयक महेशबाबा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, माधवराव गुरव, मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, सिमा घार्गे, अंजली जाधव , युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत पिसाळ, अक्षय पाटील, बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, भटके विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष विलास आटोळे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, निलेश भंडारे तसेच दीपक हजारे, राजू सोनावणे, विकास आण्णा गायकवाड, गणेश गायकवाड, तात्यासो साबळे, आण्णासाहेब निकम, ऍड. धनाजी जाधव, गणेश जाधव, विक्रम विजापुरे, विशाल शेजवळ, सोमनाथ निकम, रणजित माने, सचिन काटे, रुक्मिणी जाधव, भुजबळ मॅडम, तुकाराम नलवडे, जितेंद्र मोरे, शहाजी मोहिते, प्रभावती सुर्यवंशी, वनिता माने, अक्षय भोसले, पायल जाधव, दत्ता साळुंखे महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास अण्णा गायकवाड, दत्तात्रय साळुंखे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा कांबळे, कराड उत्तर सरचिटणीस जितेंद्र मोरे, युवा मोर्चाचे सचिन जाधव लक्ष्मण गुरव जगदीश लावंड, महिला मोर्चा पदाधिकारी वैशाली मांढरे, वैशाली भुजबळ, यमुना जाधव, स्वाती ढाणे, नकुसा चव्हाण, कराड उत्तर युवा मोर्चाचे किरण कुलकर्णी, राहुल खडग, पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, सुहास पंडित, बाळासाहेब कांबिरे, प्रशांत माने, संतोष पाटील, प्रशांत घोलप, महेश चंदुगडे, संदीप साळुंखे बनवडी रहिमतपूर मंडलचे रणजीत माने, तुषार चव्हाण, मंडल सरचिटणीस लखन साळुंखे, शिवाजी डांगे चिटणीस सुधीर जाधव , सागर ढाणे, नेताजी भोसले उपाध्यक्ष विजय घोरपडे, तुषार शितोळे, विजय पवार, किसान मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंतराजे शिंदे आदींनी भाजपाच्या श्रेष्ठींकडे मागणी केली आहे.