कपिल शर्माचे ईदनिमित्त खास गिफ्ट; नव्या चित्रपटाचे पोस्टर केले शेअर

Kis Kisko Pyaar Karoon 2 | कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. ईदच्या निमित्ताने त्याने त्याच्या नवीन चित्रपटची घोषणा केली आहे. कपिल शर्माने ‘किस किस को प्यार करूं 2’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो पांढऱ्या रंगाची शेरवानीत नवरदेवाच्या वेशात दिसत आहे. तर त्याच्या बाजूला एक मुलगी उभी आहे. तिचा चेहरा झाकलेला आहे. कपिलच्या नव्या चित्रपटाचं पोस्टरला चाहत्यांची देखील पसंती मिळत आहे. कलाकरांसह चाहत्यांही त्याला नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Kis Kisko Pyaar Karoon 2 |
View this post on Instagram
कपिल शर्माचा 2010 मध्ये ‘भावनाओ को समझो’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंत 2015 मध्ये त्याचा ‘किस किस को प्यार करूं’ हा चित्रपट आला होता. यानंतर तो ‘फिरंगी’ आणि ‘जीइगॅटो’ मध्येही दिसला. तर गेल्यावर्षी कपिल अभिनेत्री तबूसोबत ‘द क्रू’ या चित्रपटात दिसला होता. Kis Kisko Pyaar Karoon 2 |
‘किस किस को प्यार करूं’ हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला आहे. अब्बास मस्तान दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटात कपिल शर्मासह अरबाज खान, मंजरी फडनवीस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना आणि मनोज जोशी हे कलाकार देखील होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. Kis Kisko Pyaar Karoon 2 |
हेही वाचा:
हाफिज सईदचा आणखी एक जवळचा सहकारी गोळीबारात ठार ; कराचीमध्ये मोस्ट वॉन्टेड फायनान्सरची हत्या





