कपिल शर्माची नवी सुरुवात; ‘या’ ठिकाणी सुरू केलं आलिशान रेस्टॉरंट

Kapil Sharma | कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनची सुरुवात झाली आहे. एकीकडे कपिलच्या या शोची दमदार सुरुवात झाली असताना दुसरीकडे त्याने नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्याने आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी थेट कॅनडामध्ये आपलं स्वतःचं एक आलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
कपिल शर्माने ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे ‘कॅप्स कॅफे’ या नावाने रेस्टॉरंट सुरू केले आहे. कपिलची पत्नी गिन्नीने काही दिवसांपूर्वीच या कॅफेची पहिली झलक शेअर केली होती. गुलाबी रंगाच्या थीममध्ये सजवलेले हे रेस्टॉरंट आहे.
समोर आलेल्या व्हिडिओत ‘कॅप्स कॅफे’ची आकर्षक गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या सजावटीची आणि अनोख्या इंटिरियरची खास झलक दाखवली आहे. ज्यात ते खूप वेगळे आणि अनोखे दिसते. कपिलचे चाहते आणि मित्रमंडळी त्याला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये, कंटेंट क्रिएटर प्रेक्षकांना कॅनडातील व्हँकुव्हरमधील कॅप्स कॅफेची झलक दाखवतो. तो कॅफेला भेट देतो, तिथले आकर्षक गुलाबी-थीम असलेले इंटीरियर दाखवतो आणि जेवणाची ऑर्डर देखील देतो. व्हिडिओमधील मेनू बारकाईने पाहिल्यास येथे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणताही पदार्थ दिसत नाही. ज्यामुळे लोकांनी हे कॅफेसुद्धा इतर स्टार कॅफेइतकेच महागडे म्हटले आहे.
सध्या कपिल ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनमध्ये सूत्रसंचालन करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा हे क्रिकेटपटूही उपस्थित होते.
हेही वाचा:
YouTube Creators : कंटेन्ट क्रियेटर्स जरा लक्ष द्या…! YouTube ने मॉनेटायझेशन नियमात केलाय मोठा बदल





