मुंबई – कॉमेडी स्टार कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. टीआरपीमध्ये सर्वात हाय असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु त्या आधी कपिलने सर्वांना खुशखबर दिली आहे. कपिलने आपल्या अपकमिंग चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कपिल शर्मा लवकरच ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात दिसणार आहे.
या आधी कपिल शर्माचे ‘फिरंगी’ आणि किस किस से प्यार करू हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘मेगा ब्लॉकबस्टर’चा ट्रेलर 4 सप्टेंबरला रिलीज होणार आहे, अशा परिस्थितीत कपिल शर्माचे चाहते खूप खूश आहेत. कपिल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कपिल शर्मासोबत रश्मिका मंथना, तृष्णा कृष्णन आणि कार्ती या दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रीही दिसणार असल्याची चर्चा आहे.
Yeh wali mere fans ke liye. Hope aapko pasand aaye. #TrailerOut4thSept #MegaBlockbuster 😍 pic.twitter.com/bep8fMSPwQ
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) September 1, 2022
विशेष म्हणजे सौरव गांगुली,रोहित शर्मा या क्रिकेटर्सने देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे ज्याच्यावर त्यांचा फोटो असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा अजून वाढली आहे.कपिल शर्माने रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये तो ऑरेंज कलरच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू आहे. पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- “ही वाली माझ्या चाहत्यांसाठी. आशा आहे की तुम्हाला ते आवडेल.” तसेच ४ सप्टेंबर रोजी ट्रेलर रिलीज होणार असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले.