“याच्यामुळे माझ्या फिल्म चालत नाही…” अक्षय कुमारने कपिल शर्मालाच सुनावले

मुंबई -‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. अनेक दिवसांपासून हा शो पुन्हा सुरु होणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. अखेर येत्या १० सप्टेंबरपासून हा शो सुरु होतोय. शोचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचे समजते. प्रोमोमध्ये अक्षय कुमारने आपले चित्रपट फ्लॉप होण्याला कपिल शर्माला जबाबदार धरल्याचे समजते.
बॉलिवूडमधील सर्वाधिक टीआरपी असणारा द कपिल शर्मा शो पुन्हा येतोय म्हंटल्यावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. अभिनेता अक्षय कुमारदेखील या शोमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला असल्याचे प्रमोवरून समजते. यावेळी अक्षय कुमारला कपिल विचारतो,तुम्ही प्रत्येक बिर्थडेला छोटे कसे काय होता ? त्यावर अक्षय म्हणतो,”हा माणूस सगळ्या गोष्टींना एव्हढी नजर लावतो,माझ्या चित्रपटांवर पैशांवर नजर लावली आता फिल्मचं चालत नाही माझी कोणती”. यानंतर एकच हशा पिकतो.
View this post on Instagram
कपिल शर्मा शोमध्ये यावेळी नेहमीचे कॉमीडियन दिसणार नसून सृष्टी रोडे, गौरव दुबे आणि सिद्धार्थ सागर हे नावे चेहरे झळकणार आहेत. सोनी टीव्हीवर येत्या १० सप्टेंबरपासून हा शो प्रसारित होणार आहे. नेहमीपेक्षा अनेक नवीन सेगमेंट यावेळी पाहायला मिळणार आहे.





