Bhoot Bangla first day Box Office Collection : भूत बंगला (Bhoot Bangla) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एका दशकानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे हे दोघे पडद्यावर आपली जादू पुन्हा निर्माण करू शकतात का, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
सॅकनिल्कच्या ताज्या माहितीनुसार, ‘भूत बंगला’ने पहिल्याच दिवशी 12.25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.3 लाख तिकिटांची विक्री केली आहे. चित्रपटाने गुरुवारीही चांगली कामगिरी केली असून पेड प्रिव्ह्यूमधून 3.50 कोटींची निव्वळ कमाई केली आहे.

या चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 18.90 कोटी आणि नेट कलेक्शन 15.75 कोटी झाले आहे. याचा अर्थ असा की, ‘भूत बंगला’ने कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’च्या 14.50 कोटी या रक्कमेला पहिल्याच दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे. यावरुन विकेंडला भूत बंगला कशी कामगिरी बॅाक्स अॅाफिसवर करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Bhoot Bangla first day Box Office Collection
प्रियदर्शन दिग्दर्शित, हेरा फेरी (2000), गरम मसाला (2005), भागम भाग (2006), भूल भुलैया (2007), दे दना दान (2009), आणि खट्टा मीठा (2010) यांसारख्या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने काम केले आहे.
भूत बंगला चित्रपटात वामिका गब्बी, तब्बू, राजपाल यादव, परेश रावल, दिवंगत अभिनेते असरानी आणि जिशु सेनगुप्ता यांच्याही भूमिका आहेत. केप ऑफ गुड फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा विभाग बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा : Navneet Rana : “पंतप्रधान नरेंद्र मोदींची आम्ही माफी मागतो”; नवनीत राणांना अश्रु अनावर, विरोधकांना सुनावले खडेबोल