Kapil Dev Statement : ‘रोहित आयुष्यभर खेळत राहणार नाही…’; खराब फॉर्मनंतर कपिल देव यांचा इशारा, तर प्रज्ञान ओझालाही दिला सल्ला
Kapil Dev Statement : न्यूझीलंड दौऱ्यातील रोहित शर्माच्या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी रोहितबद्दल एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

Kapil Dev Statement On Rohit Sharma Retirement Pragyan Ojha ODI World Cup : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय भविष्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या ३९ वर्षीय रोहितला या मालिकेतील चार सामन्यांत केवळ ३० धावा करता आल्या, ज्यामध्ये तो दोनदा शून्यावर बाद झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर आता भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी रोखठोक मत मांडत निवड समितीकडे चेंडू टोलवला आहे.
‘रोहित शर्मा आयुष्यभर खेळत राहणार नाही’; कपिल देव यांचा स्पष्ट इशारा
‘संडे मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, “जर तो (रोहित शर्मा) खेळू शकत असेल, तर ते ठीक आहे. तो निर्णय मी निवड समितीवर सोपवू इच्छितो. जर त्यांनी ठरवले की त्याची वेळ संपली आहे, तर तो पूर्णपणे निवड समितीचा निर्णय आहे, कारण ते एकत्रितपणे खेळासाठी सर्वोत्तम काय आहे याचा विचार करतात. रोहितने देशासाठी प्रचंड योगदान दिले आहे, पण तो आयुष्यभर भारतीय संघाकडून खेळणार नाही. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनाही एक दिवस संघ सोडावाच लागला. प्रत्येक खेळाडूला एक दिवस निवृत्त व्हावेच लागते.”
जुना मित्र प्रज्ञान ओझासमोर मोठा पेच; वर्ल्ड कप निवडीवर टांगती तलवार
Kapil Dev On Rohit Sharma
“If he can play, fine. I would leave it to the selectors. If they take a call, his time is over.”
Kapil also reminded everyone that even legends like Sachin, Dhoni and Gavaskar had to move on eventually.
The final decision rests with the selectors. https://t.co/4bBwEI8ZWQ
— Crickyappa (@Crickyappa_04) November 16, 2026
दुसरीकडे, रोहितच्या सततच्या खराब फॉर्ममुळे मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्युनियर क्रिकेट आणि आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स तसेच मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळलेले रोहित आणि प्रज्ञान आज अत्यंत कठीण वळणावर उभे आहेत. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी, केवळ जिद्दीच्या जोरावर रोहितला संघात स्थान द्यायचे का, हा मोठा पेच ओझा यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
लॉर्ड्सवरील निवृत्तीच्या प्रस्तावावरून यापूर्वीही उडाले होते खटके –
🚨 THE FINAL NZ ODI TOUR 🚨
Indian players who achieved these rare feats across all SENA countries:
𝗢𝗗𝗜 𝗖𝗲𝗻𝘁𝘂𝗿𝗶𝗲𝘀 : Sachin Tendulkar, Virat Kohli & Shikhar Dhawan
𝗢𝗗𝗜 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗠𝗮𝘁𝗰𝗵: Kapil Dev, Sachin Tendulkar & Rohit Sharma
Unfortunately, Rohit couldn’t register an ODI hundred in New Zealand, while Kohli missed out on winning a P.O.M. award in the country.
💔 Sadly, this was likely their final ODI tour of New Zealand. https://t.co/86GRlsbtk5
— 𝗩𝗞 𝟭𝟴 (@gurlabhsingh610) November 15, 2026
या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यापूर्वी तत्कालीन निवडकर्ता अजित आगरकर यांच्या सांगण्यावरून ओझा यांनी रोहितला लॉर्ड्सवर निवृत्ती घेण्याबाबत विचारले होते; मात्र रोहितने वरिष्ठांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती, ज्याचा शेवट आगरकर यांच्या कटू निरोपात झाला होता. आता भारतीय एकदिवसीय संघातील आपले स्थान टिकवण्यासाठी रोहितला धावा करणे अनिवार्य ठरणार आहे.





