कपिल देव यांच्या निधनाची अफवा
Updated On:

नवी दिल्ली – भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या निधनाच्या वृत्ताने आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगलाच संभ्रम निर्माण झाला होता. या स्पर्धेतील खेळाडूंनीही सोशल मीडियावरील या पोस्टची खातरजमा करून घेतली तसेच कपिल देव यांच्याबाबतची पोस्ट ही अफवा आहे हे समजल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
काही दिवसांपूर्वी कपिल यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे नवी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीथे त्यांच्यावर ऍन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांना घरीही सोडण्यात आले होते.
सोमवारी सकाळपासून त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. आपली प्रकृती उत्तम असल्याचे खुद्द कपिल देव यांनी स्पष्ट केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.





