पुणे | श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात पुणे मनपा शाळेतील ५१ मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. या वेळी मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना शालेय साहित्य, दप्तर (सॅक) आणि खाऊ देखील देण्यात आला.
कार्यक्रमाला सहायक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुनसे, सोनिया कोंजेटी, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मुलींनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला, तसेच गाणीही म्हटली. याला उपस्थितांनी दाद दिली. अनेक मुली या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मंदिरात आल्या होत्या. उपस्थित सर्वांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.





