छत्तीसगडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; १० नक्षलवादी ठार, 2 जवान जखमी

Kanker Encounter । महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवरील अबुझमद, ताकामेटा, कोकूर आणि माड या जंगलांमध्ये शुक्रवारी सकाळपासून नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. या काळात नक्षलवाद्यांशी चकमक झाल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी आतापर्यंत १० नाक्षवाद्यांना ठार केले असून पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी दोन शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त केली आहेत.
छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अबुझमदच्या जंगलात 100 हून अधिक नक्षलवादी असल्याची माहिती पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेला एक दिवसापूर्वी मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. यावेळी नक्षलवाद्यांकडून सतत गोळीबार सुरू आहे.
एसपी कांकेर यांनी याला दुजोरा दिला Kanker Encounter ।
कांकेर नारायणपूर जिल्ह्यात सकाळपासून माडच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कांकेरचे एसपी कल्याण अलीसेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
दोन जवानही जखमी झाले Kanker Encounter ।
कांकेरच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दोन्ही जखमी जवानांवर उत्तम उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. जखमी सैनिकांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी MI-17 हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आणि त्यांना रायपूरला एअरलिफ्ट करण्यात आले. या जवानांना चांगल्या उपचारासाठी रायपूरला नेण्यात येत आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की चकमक अद्याप संपलेली नाही आणि परिसरात शोध मोहीम सुरू आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही कारवाई नक्षलवाद्यांविरुद्धची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून सर्व प्रमुख सुरक्षा यंत्रणा त्याबाबत सतर्क आहेत.





